(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘व्‍यापक पक्षाघात उपचार केंद्राचे’ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते लोकार्पण | मराठी १ नंबर बातम्या

‘व्‍यापक पक्षाघात उपचार केंद्राचे’ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते लोकार्पण

मुंबई ( १० ऑक्टोबर २०१८ ) : एखादया व्‍यक्‍तिला पक्षघात झाल्‍यानंतर त्‍याचे संपूर्ण कुटुंबच तूटून पडते त्‍यावेळी आपण डॉक्‍टर मंडळी देव दूत बनून त्‍याचे प्राण वाचविता. आपल्‍या या चांगल्‍या कार्यामुळेच आरोग्‍य सेवेचा मला सार्थ अभिमान असल्‍याचे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

रा.ए.स्‍मा. रुग्‍णालयाच्‍या मज्‍जातंतू शल्‍य चिकित्‍सा विभागातील ‘व्‍यापक पक्षाघात उपचार केंद्राचे’ लोकार्पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा हस्‍ते परळच्‍या रा.ए.स्‍मा. रुग्‍णालयातील डॉ.जीवराज मेहता सभागृहात आयोजित समारंभात आज (१० ऑक्टोबर, २०१८) दुपारी पार पडले, त्‍यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर, उप महापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्‍त अजोय मेहता, स्‍थानिक आमदार अजय चौधरी, आमदार सुनिल शिंदे, सभागृह नेता विशाखा राऊत, स्‍थायी समिती अध्‍यक्ष यशवंत जाधव, बेस्‍ट समिती अध्‍यक्ष आशिष चेंबुरकर, स्‍थापत्‍य समिती (शहर) अध्‍यक्षा अरुंधती दुधवडकर, सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा डॉ. अर्चना भालेराव, एफ/दक्षिण आणि एफ उत्‍तर प्रभाग समिती अध्‍यक्ष सचिन पडवळ, महिला व बाल कल्‍याण समिती अध्‍यक्षा स्‍मिता गावकर, माजी महापौर तथा नगरसेविका श्रध्‍दा जाधव, माजी महापौर तथा नगरसेविका स्‍नेहल आंबेकर, स्‍थानिक नगरसेविका सिंधू मसूरकर, उप आयुक्‍त (आरोग्‍य सेवा) सुनिल धामणे, उप आयुक्‍त (मध्‍यवर्ती खरेदी खाते) रामभाऊ धस, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्‍णालय) डॉ. अविनाश सुपे, नगरसेवक रमेश कोरगावंकर, अनिल कोकीळ नगरसेविका किशोरी पेडणेकर तसेच महापालिकेचे संबंधि‍त अधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बोलताना पुढे म्‍हणाले की, बृहन्‍मुंबई महापालिका बऱयाच क्षेत्रात आपली सेवा देत असताना डॉक्‍टर, रुग्‍ण, परिचारिका यांच्‍या एकत्रित परिणामातून आपण आज वैद्यकीय क्षेत्रातील अद्भभूत चमत्‍कार बघि‍तला आहे.त्‍यामुळेच मनपाची आरोग्‍य सेवा ही जगातील सर्वोत्‍तम आरोग्‍य सेवेपैकी एक आहे.महापालिकेचे डॉक्‍टर मंडळी ही मर्दासारखी काम करित असते जसे की साथीचे आजार असो की आणखी कोणते आजार आपण रुग्‍णांना ठणठणीत करुनच घरी पाठवित असता ही खुप मोठी गोष्‍ट असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.यापुढेही तुम्‍ही असेच चांगले काम करित रहा आम्‍ही आमची संपूर्ण ताकद तुमच्‍या पाठीशी उभी करु, अशी ग्‍वाही त्‍यांनी शेवटी दिली.

महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, डॉक्‍टर व नर्सेस खरोखरच अभिनंदनास पात्र असून आपण सर्वजण रुग्‍णसेवेसाठी कटिबध्‍द आहात याचा आम्‍हाला सर्वस्‍वी अभिमान असल्‍याचे ते म्‍हणाले.रुग्‍णाला माणूस म्‍हणून आयुष्‍यात पुन्‍हा उभे करण्‍याचे शिवधनुष्‍य आपण पेलत आहात याचा मुंबईचा प्रथम नागरिक म्‍हणून अभिमान असल्‍याचे ते म्‍हणाले. यापुढील काळातही जनतेचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी आम्‍ही कटिबध्‍द असल्‍याचे ते शेवटी म्‍हणाले.

महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, दीड किलोमीटरच्‍या आतमध्‍ये मुंबईतील ८० टक्‍के रुग्‍णांना महापालिकेची आरोग्‍य सेवा देत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍याचप्रमाणे आपल्‍या रुग्‍णालयाची ७० लाख रुग्‍णांची क्षमता असताना आपण दिड कोटी रुग्‍णांवर उपचार करित असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍यासोबतच यावर्षी आपण आरोग्‍य सेवेवर ७०६ कोटी रुपये खर्च करित असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आगामी काळात महापालिकेच्‍या १८३ दवाखान्‍यांमध्‍ये १७ प्राथमिक साधने असणे अनिवार्य करण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.त्‍यासोबतच महापालिका रुग्‍णालयात आवश्‍यक १०१ व विशेष ३८ रुग्‍ण तपासण्‍या लवकरच सुरु करणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले. प्रत्‍येक रुग्‍णांचे रेकॉर्ड तात्‍काळ कोणत्‍याही रुग्‍णालयात उपलब्‍ध झाले पाहिजे यासाठी आयटीच्या मदतीने आपण नविन रेकॉर्ड जतन प्रणाली विकसित करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. जगातील चांगले तंत्रज्ञान महापालिकेच्‍या रुग्‍णालयात येण्‍यासाठी डॉक्‍टरांचा एक अभ्‍यास गट स्‍थापन करण्‍याची सूचना त्‍यांनी यावेळी संचालक (वै.शि.प्र.रु.) डॉ. अ‍विनाश सुपे यांना यावेळी केली.

प्रारंभी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते फि‍त कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करुन व्‍यापक पक्षाघात केंद्राचे लोकार्पण करण्‍यात आले. यानंतर मान्‍यवरांनी या विभागातील अद्ययावत मशिनची पाहणी करुन डॉक्‍टरांशी चर्चा केली.याप्रसंगी संबधित विभागाच्‍या वतीने सादरीकरण करण्‍यात आले. कार्यक्रमाला मोठया संख्‍येने नागरिकांची उपस्थिती होती.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget