(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बारा बलुतेदारांच्‍या पध्‍दतीवर आधारित मुंबईतील पहिलेच शिल्‍पग्राम | मराठी १ नंबर बातम्या

बारा बलुतेदारांच्‍या पध्‍दतीवर आधारित मुंबईतील पहिलेच शिल्‍पग्राम

मुंबई ( १४ ऑक्टोबर २०१८ ) : जुन्‍या काळात बारा बलुतेदार पध्‍दतीमध्‍ये रुपयांचा वापर न करता वस्‍तुंची देवाणघेवाण करुन कामाला असलेले महत्‍व तसेच सर्व समाजांमध्‍ये चालणारे आपसी व्‍यवहार व देवाणघेवाण याची माहिती नविन पिढीला व्‍हावी यासाठी बारा बलुतेदारांच्‍या कार्यावर आधारित शिल्‍पग्राम उद्यान बृहन्‍मुंबई महापालिकेतर्फे विकसित करण्‍यात आले असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.

जोगेश्‍वरी (पूर्व) च्‍या पूनमनगरमधील ‘ मातोश्री मिनाताई ठाकरे शिल्‍पग्राम’ चे लोकार्पण शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते तसेच महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आज ( दि.१४ ऑक्टोबर, २०१८) सायंकाळी पुनमनगरमधील, मातोश्री मिनाताई ठाकरे शिल्‍पग्राम येथे पार पडले, त्‍यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते.

याप्रसंगी गृहनिर्माण राज्‍यमंत्री रविंद्र वायकर, आमदार सुनिल प्रभु, स्‍थापत्‍य समिती (उपनगरे) अध्‍यक्षा साधना माने, बाजार व उद्यान समिती अध्‍यक्ष हाजी मोहम्‍मद हलीम खान, नगरसेवक सर्वश्री अनंत नर, प्रविण शिंदे, महापालिका उप आयुक्‍त (आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन) डॉ. किशोर क्षीरसागर, उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी तसेच महापालिकेचे संबंधि‍त अधिकारी व नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर बोलताना पुढे म्‍हणाले की, अतिशय सुंदर असे उद्यान लोकार्पण करताना आनंद होत असून लगतच्‍या जलखात्‍याच्‍या जागेवर सुध्‍दा पर्यावरणपुरक अश्‍या वृक्षांची लागवड करण्‍याची सूचना महापौरांनी यावेळी केली. मुंबईतील कोणत्‍याही व्‍यक्तिने हे शिल्‍पग्राम बघि‍तल्‍यानंतर थक्‍कच व्‍हावे असे अप्रतिम हे शि‍ल्पग्राम बनविण्‍यात आले असून अश्‍याप्रकारचे मुंबईतील हे एकमेव शिल्‍पग्राम असल्‍याचे महापौरांनी सांगितले. त्‍यासोबतच हे शिल्‍पग्राम जनतेसाठी खुले करण्‍यात येत असून परिसरातील जनतेने याचा मनमुराद आनंद लुटावा असे आवाहनही महापौरांनी शेवटी केले.

महापालिका उप आयुक्‍त (आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन) डॉ. किशोर क्षीरसागर मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, या शिल्‍पग्राममध्‍ये महाराष्‍ट्राच्‍या वेगवेगळया भागातील हस्‍तकला, शोभेच्‍या वास्‍तु तसेच खाद्यसंस्‍कृती यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी जागा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. त्‍याचप्रमाणे पाचशे श्रोते बसतील इतक्‍या मोठया आकाराचे अॅम्‍पी थि‍येटर हे संगीत कारंजासह तयार करण्‍यात आले आहे. त्‍याचप्रमाणे विविध प्रकारच्‍या महोत्‍सवाचे आयोजनसुध्‍दा याठिकाणी करता येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सदर उद्यानाचे काम २०१५ ते २०१७ या दोन वर्षाच्‍या काळात करण्‍यात आले आहे. विविधतेने नटलेल्‍या भारत देशाच्‍या संस्कृतीचे दर्शन व त्‍याचबरोबर निसर्ग, कलाकुसर, संगीत यांची एक अनोखी संगती याठिकाणी अनुभवण्‍यास मिळणार आहे. हैद्राबाद येथील शिल्‍पग्राम, दिल्ली हट, सवाई माधवपुर शिल्‍पग्राम यांच्‍या धर्तीवर मुंबईतील असे एकमेव उद्यान विकसीत करण्‍यात आले आहे.

प्रारंभी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते फि‍त कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करुन ‘ मातोश्री मिनाताई ठाकरे शिल्‍पग्राम’ चे लोकार्पण करण्‍यात आले. यानंतर मान्‍यवरांनी संपूर्ण उद्यानाला फेरफटका मारुन याठिकाणी असलेल्‍या बारा बलुतेदारांच्‍या शिल्‍पांची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. तसेच जलखात्‍याच्‍या जागेची सुध्‍दा यावेळी पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन चारुशिला शेणॉय यांनी केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget