मुंबई ( १६ ऑक्टोबर २०१८ ) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यातील अरुणा मध्यम प्रकल्पास 2016-17 च्या दरसूचीनुसार 1 हजार 689 कोटी किंमतीस तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 5 हजार 310 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत वैभववाडी तालुक्यातील हेत येथे अरुणा नदीवर 93.378 दशलक्ष घनमीटर क्षमतेचे धरण बांधण्यात येत आहे. या धरणामुळे वैभववाडी तालुक्याच्या 15 गावातील 4 हजार 475 हेक्टर व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्याच्या दोन गावांतील 835 हेक्टर क्षेत्र अशा एकूण 5 हजार 310 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा