मुंबई ( १६ ऑक्टोबर २०१८ ) : सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील कुडाळी मध्यम प्रकल्पास 2013-14 च्या दरसूचीनुसार 635 कोटी किंमतीस दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे जावळी तालुक्यातील 42 गावांतील 5 हजार 327 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
कुडाळी मध्यम प्रकल्पांतर्गत कुडाळी नदीवर जावळी तालुक्यातील महू आणि हातगेघर येथे धरणे बांधण्यात येत आहेत. या दोन्ही धरणांवर प्रत्येकी दोन अशा एकूण 4 उपसा सिंचन योजना सुरु करण्यात येणार आहेत. त्याद्वारे 461 हेक्टर क्षेत्रास आणि कालव्याद्वारे 4688 हेक्टर क्षेत्रास अशा एकूण 5 हजार 327 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा