(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कलाश्रम अंतर्गत ''अभियान सन्मान'' | मराठी १ नंबर बातम्या

कलाश्रम अंतर्गत ''अभियान सन्मान''

मुंबई ( रविवार ) : स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्र या संस्थेच्यावतीने कलाश्रम अंतर्गत ''अभियान सन्मान'' या उपक्रमाद्वारे स्वतः बरोबर समाजासाठी वैविध्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेत त्यांच्या कर्तृत्वाचे आलेख मांडणारे दखलपत्र देऊन सन्मान करणारा कार्यक्रम रविंद्र नाट्य मंदिर येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या भरतनाट्यम हॉल मध्ये रविवारी (३० सप्टेंबर ) संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन कृष्णाबाई लक्ष्मण घाग व शकुंतला भालचंद्र घाडीगावकर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तुळसा मोरे, निराबाई पाटिल, आदर्श माता कृष्णाबाई घाग, सुमित्रा पवार यांचे सप्टेंबर २०१८ महिन्यातील स्मृती दिनाचे निमित्त घेऊन हे दखल पत्र गायक संगीतकार शशी मुंबरे, अभिनेता सामाजिक कार्यकर्ता अशोक सांवत, प्रसिद्ध दिवंगत मूर्तीकार विजय खातू यांची कन्या रेश्मा खातू, निर्माता लोककलेचा जागर करणारा सचिन पाताडे यांना वस्त्रहरणफेम नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते हे दखलपत्र दिले गेले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली वाडेकर यांनी केले तर दखलपत्र वाचन अलका सपकाळे, अपूर्वा शिर्के, अमित सोलंकी आणि अर्पिता कोयंडे यांनी केले. तसेच यावेळी सुभाष डामरे मित्र मंडळ आणि इंद्रवदन सहनिवास यांच्या सहकार्याने गणराज चषक व नाट्य प्रवेश स्पर्धेतील विजेत्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

.................................

देवेंद्र मोरे ( तुळसा मोरे यांचा मुलगा )
दुसऱ्यांच्या आई वडिलांसाठी तसे कोणी करत नाही. कलाश्रम मात्र पुढाकार घेऊन दुसऱ्यांच्या आई वडिलांचा आदर यानिमित्ताने करत आहे, ही मोठी गोष्ट आहे आणि भविष्यात या उपक्रमाला भरपूर यश मिळेल.

निशांत पवार ( सुमित्रा पवार यांचा नातू )

माझ्या ध्यानीमनी ही नव्हत की, माझ्या आजीच निधन झाल कोकणात परंतु मुंबईत तिच्या नावाच मानपत्र दिले जाईल. मी भारावून गेलो आहे. त्यामुळे मला फारस काही बोलता येणार नाही. 

तानाजी घाग ( कृष्णाबाई घाग यांचा मुलगा )
आपण आईच्या सनिध्यात एवढे वर्ष राहतो. पण आईचा वाढदिवस कधी असतो, त्याची तारीख आपल्याकडे नोंद नसते. मग असा काही प्रसंग आला की, मग आपल्या आठवते की, आपल्या आईची जन्म तारीख नाही आहे. तर असे करू नका. आपल्या आईशी सवांद साधून तिची तारीख आपल्याकडे संग्रहित असू दया. जसे तुम्ही पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवता त्याप्रमाणे आईचा वाढदिवस ही लक्षात असायला हवा.

आई आणि वडिल एकच बोलायचे 'साहेब व्हा' पण 'साहेब व्हा' म्हणजे काय, हे त्याना नेमक माहीत नव्हत. आज माझा एक भाऊ पालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहे. दुसरा भाऊ कंत्राटदार आहे. मी पालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभागात अधिकारी पदावर कार्यरत आहे. पण आमच विश्व पाहण्यास आज आई वडील नाहीत.

नंदकुमार पाटिल ( निराबाई पाटिल यांचा मुलगा ) 
दिसायला आम्ही फार श्रीमंत दिसत होतो. म्हणजे वडील राजकीय क्षेत्रात नगरसेवक म्हणून उभे सोबत ते डॉक्टर होते. सामाजिक कार्यकर्ते होते. त्यामुळे लोकांना असे वाटे की, यांच्या घरात किती काय असेल पण आमच्या घरात चूल ही पेटत नव्हती. इतकी गरीब परिस्थिति होती. मी स्वतः करवंट्या जमा करून आईला देयाचो आणि आई त्यावर चूल पेटवून जेवण करायची. हजार स्केअर फूट ची जागा असून एका खोलीत अडगळीच्या जागेत चूलची जागा आईने तयार केली होती. घरातील मंडळी कामासाठी घराबाहेर पडले की, त्या चुलीवर जेवण करायची हे मी माझ्या डोळ्याने पाहिले. आई सांगायची की, 'कोणाला सांगू नकोस'. अशी परिस्थिती पाहिली. त्यावेळी ती बोलायची 'तुला हे सर्व पेलता आले पाहिजे'. मी आज १२०० मुलाखती छापल्या पण एकाही माणसाकडून आयुष्यात चहा किंवा पैसे मागितले नाही. किंवा मला मदत करा असेही सांगितले नाही. ही प्रेरणा मला माझ्या आईने दिली.

वस्त्रहरणफेम नाटककार गंगाराम गवाणकर - माझा वस्त्रहरण नाटकाचा प्रयोग सोडून आज येथे उपस्थित आहे. आईच्या नावाने सन्मान हा जो कार्यक्रम येथे सादर झाला हा इतका सुंदर आहे की हा कार्यक्रम पुढे नक्कीच षण्मुखानंद येथे होईल, असा माझा विश्वास आहे. माझ्या शुभेच्छा आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget