मुंबई ( ५ ओक्टोबर २०१८ ) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील काही भीक माग्या नेत्यांनी आनंदराज आंबेडकर यांना राजकरण शिकवण्याची गरज नाही. आम्ही डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर चालत असून मंत्री पदाची भीक मागत फिरत नाही, असे मत सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकातून मांडले आहे.
डॉ. बाबासाहेबांनी स्वत: जेव्हा राजकीय आरक्षणाची परिस्थिती पाहिली तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि, राजकीय आरक्षणातून जाणारे प्रतिनिधी फक्त समाजाच्या नावाचा वापर करतात. परंतु त्यांची बांधिलकी त्यांच्या राजकिय पक्षाबरोबरच असते. त्यामुळे असे प्रतिनिधी मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व करत असताना समाजाच्या प्रश्नांवर कधी ही तोंड उघडत नाहीत. किंबहुना अनेक वेळा असे ही आढळून आले की, सांसद /विधान सभेत मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर बोलण्याची वेळ येते तेव्हा ही मंडळी गप बसून असतात. यांचे अत्यंत चागले उदाहरण मागासवर्गीयांसाठी केंद्र व राज्य सरकार मधील बजेट मध्ये त्यांच्या त्यांच्या संख्येच्या अनुरूप असणारा मागासवर्गीय खास निधी कधीच वापरला जात नाही. तो इतरत्रच वळवळ जातो. परंतु याच विषयावरती कोणताही आवाज उठवला गेला हे आतपर्यंत कधी ही दिसले नाही. तसेच 1 जानेवारी ला भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या भ्याड हल्लात सुद्धा आंबेडकरी जनतेला स्वत:च 3 जानेवारी ला संपुर्ण महाराष्ट्र बंद करून न्याय मिळवून घ्यावा लागला.
महाराष्ट्रातील खैरांजली प्रकरण किंवा नितीन आगे प्रकरण अशा अनेक प्रकऱणा मध्ये या राखीव जागेच्या प्रतिनिधीनी सभागृह बंद पाडले किंवा त्याबद्द्ल आवाज उठवला, असे कधीच दिसले नाही. त्यामुळे राजकीय आरक्षण बंद झाले तर अशा भीक माग्या दासांची निर्मिती बंद होईल, ही अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देखील होती, असे मत रिपब्लिकन सेनेचे लोकनेते, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकातून मांडले आहे.

टिप्पणी पोस्ट करा