मोहन माचिवाल यांच्यासह किनारी रस्ता प्रकल्पाच्या चमुचाही सन्मान
मुंबई : महानगरपालिका क्षेत्राची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि मर्यादा लक्षात घेऊन मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सुलभ, प्रभावी, गतिमान आणि पर्यावरणस्नेही करण्यासाठी महापालिकेने आता सागरी किनारा रस्ता प्रकल्प यासारखा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सागरी किनाऱ्यालागत बांधण्यात येणारा हा रस्ता, या प्रकारचा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. यामुळे या प्रकल्पाच्या विविध बाजूंचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासह केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरील विविध 18 परवानग्या प्राप्त करणे, हे एक मोठे आव्हानच होते. मात्र या प्रकल्पासाठी स्वतंत्र्यपणे तयार करण्यात आलेल्या किनारी रस्ता प्रकल्प या कक्षाद्वारे सागरी किनारा रस्त्यासाठी आवश्यक असणारी विविध कामे समर्थपणे करण्यात येत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकल्पासाठी अहोरात्र मेहनत घेणारे किनारी रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांचा प्रतिनिधीक स्वरूपात ऑक्टोबर 2018 करिता महिन्याचे मानकरी अर्थात ऑफिसर ऑफ द मंथ या बहुमानाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभादरम्यान किनारी रस्ता प्रकल्प कक्षाच्या प्रमुख अभियंत्यासह सर्व 11 अभियंते उपस्थित होते. या प्रसंगी महापालिका आयुक्तांनी किनारी रस्ता प्रकल्प कक्षाच्या सर्व चमूचे अभिनंदन केले. यामध्ये प्रमुख अभियंता माचिवाल यांच्यासह 2 कार्यकारी अभियंता, 5 सहाय्यक अभियंता आणि 3 दुय्यम अभियंत्याचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा