मुंबई ( ५ ओक्टोबर २०१८ ) : विलेपार्ले (पूर्व) च्या रुईया बंगल्यामध्ये उत्तर भारतीय महिलांचे विहिरीवर धार्मिक कार्य सुरु असताना विहिरीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये आठ ते दहा महिलांचे प्राण वाचविणाऱ्या सिध्देश महाबदी यांचा मुंबईचे महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांचा हस्ते आज (०५ ऑक्टोबर, २०१८) महापौर निवासस्थानी आयोजित छोटेखानी समारंभात शाल, श्रीफळ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नितीन डिचोलकर, प्रदीप वेदक, संदीप कदम यांनी संबधित युवकाला महापालिकेमध्ये जीवरक्षक म्हणून नेमणूक करण्याची मागणी महापौरांकडे यावेळी केली.
टिप्पणी पोस्ट करा