मुंबई ( ३ ऑक्टोबर २०१८ ) : केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत ससून गोदी मासेमारी बंदराच्या आधुनिकीकरण प्रकल्पास मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे बंदराची मच्छिमारी नौका सामावून घेण्याची क्षमता वाढणार असून विविध आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
जुने ससून डॉक व नवीन ससून डॉक येथील मासेमारी बंदरांचे महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाकडून आधुनिकीकरण करण्यात येत आहे. यासाठी 2014 मध्ये 52 कोटी 17 लाखाच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 2017 च्या सुधारित दरसूचीनुसार मुळ प्रकल्पात 12 कोटी 18 लाखाची वाढ होऊन 64 कोटी 34 लाखावर प्रकल्प पोहोचला आहे. तसेच बंदर आधुनिकीकरण प्रकल्पांतर्गत 32 कोटी 57 लाखाची नवीन कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापूर्वी मंजूर कामे आणि नव्याने प्रस्तावित कामे असा एकूण 96 कोटी 92 लाखाच्या प्रकल्प अहवालास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पानुसार बंदरात मच्छिमारी नौका लावण्याची क्षमता वाढविणे, मच्छिमारांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देणे यासह विविध सुधारणा करण्यात येणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा