(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); 8 ते 14 जानेवारी दरम्यान राज्य कला प्रदर्शन | मराठी १ नंबर बातम्या

8 ते 14 जानेवारी दरम्यान राज्य कला प्रदर्शन

मुंबई ( १२ ऑक्टोबर २०१८ ) : कला संचालनालयामार्फत 59 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन8 ते 14 जानेवारी 2019 दरम्यान करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन कला संचालनालयाच्या व्यावसायिक कलाकार विभागामार्फत भरविण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्रचित्रण आणि दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत. या प्रदर्शनात बक्षिसपात्र कलाकृतींना प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे एकूण 15 पारितोषिके देण्यात येणार आहेत.

इच्छुक कलावंतांनी दिनांक 29 आणि 30 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत या कालावधीत कला संचालनालयाचे सर ज. जी. कला दालन, कला शाळा आवार, डॉ. दा.नौ. मार्ग,मुंबई 400001 येथे आपल्या कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन प्रदर्शन अधिकारी गो. वि. पांगरेकर यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget