शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे चित्ररथ प्रभावी माध्यम - प्रा. राम शिंदे
मुंबई ( २२ जानेवारी २०१९ ) : राज्य शासनाने राबविलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम चित्ररथांच्या माध्यमातून प्रभावीपणे होते, असे प्रतिपादन राज्याचे राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे केले.
राज्य शासनाच्यावतीने गेल्या वर्षी 26 जानेवारी 2018 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात विविध विभागांचे चित्ररथ सहभागी झाले होते. या चित्ररथातील सर्वोकृष्ट चित्ररथांना आज प्रा. शिंदे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. शिवाजी पार्क येथे झालेल्या गेल्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात 13 विभागांचे रथ सहभागी झाले होते. या चित्ररथांची पाहणी करून गुणांकनाच्या आधारे पहिले तीन सर्वोकृष्ट चित्ररथ घोषित करण्यात आले. पहिला क्रमांक मिळविलेल्या कृषी विभागाच्या चित्ररथाचे पारितोषिक कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी तर दुसरा क्रमांक मिळविलेल्या मुंबई प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या चित्ररथाचे पारितोषिक सहआयुक्त संजय खंदारे यांनी तर ठाकरे यांनी वन विभागाच्या चित्ररथाचे पारितोषिक स्वीकारले. प्रा. शिंदे म्हणाले, राज्य शासन अनेक योजना राबवित असते. त्या योजनाचे संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी चित्ररथांचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे यंदाही सर्व विभागांने विविध योजनांची माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवावी.

टिप्पणी पोस्ट करा