(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यपालांच्या हस्ते ‘महालक्ष्मी सरस’चे आज उद्घाटन | मराठी १ नंबर बातम्या

राज्यपालांच्या हस्ते ‘महालक्ष्मी सरस’चे आज उद्घाटन

मुंबई ( २२ जानेवारी २०१९ ) : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या सहभागातून आयोजित ‘महालक्ष्मी सरस’ या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्या बुधवार दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वांद्रा कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदान क्रमांक १, ४, ५ व ६ येथे होणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यंदा प्रदर्शनात राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातील बचतगट सहभागी झाले असून ५११ स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्य संस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे. हे प्रदर्शन दिनांक २२ जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत खुले राहणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

उद्घाटन समारंभाला शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्राम विकास व महिला-बालविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget