(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आकस्मिकता योजना (काँटीजन्सी प्लान) समितीचा अंतिम अहवाल सादर | मराठी १ नंबर बातम्या

आकस्मिकता योजना (काँटीजन्सी प्लान) समितीचा अंतिम अहवाल सादर

मुंबई ( २२ जानेवारी २०१९ ) : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम , 1989 मधील कलम 15 अन्वये अत्याचार झालेल्या पीडितास मोबदला, जमीन, घर, पुनर्वसन, नोकरी, पेन्शन व इतर सुविधा देण्यासाठी आकस्मिकता योजना (काँटीजन्सी प्लान) समितीचा अंतिम अहवाल आज आकस्मित योजना समितीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांना मंत्रालयात सुपूर्द केला.

यावेळी बोलताना बडोले म्हणाले, या अहवालातील तरतुदीनुसार अत्याचारग्रस्त पीडित व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटुंबियांना देय असलेल्या विविध सुविधा, अर्थसहाय्य इत्यादी जबाबदार असलेले विभाग व अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली आहे. तसेच सदर अर्थसहाय्य व सुविधा पुरविण्यासाठी लागणाऱ्या वेळेची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. या आकस्मिकता योजनांमुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींमधील अत्याचारग्रस्त पीडितांना न्याय मिळणार आहे.

प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्य समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये सी.एल.थूल, सुखदेव थोरात, केसर खलिद, अविनाश बनकर, ॲड. केवल उके, संदेश वाघ, ॲड. मनिष सोनोने, ॲड. शशिकांत बोरकर, डॉ. शलिनी डोंगरे, डॉ. प्रशांत पगारे, ज्योती बडेकर, उपायुक्त (नाहसं) समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांचा समावेश होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget