(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); प्रजासत्ताक दिन चित्ररथ स्पर्धा : कृषी विभागास प्रथम पारितोषिक | मराठी १ नंबर बातम्या

प्रजासत्ताक दिन चित्ररथ स्पर्धा : कृषी विभागास प्रथम पारितोषिक

मुंबई ( २१ जानेवारी २०१९ ) : राज्य शासनाच्या वतीने गेल्या वर्षी 26 जानेवारी 2018 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यातील सहभागी चित्ररथांच्या स्पर्धेत कृषी विभागाच्या चित्ररथास प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. या स्पर्धेचा पारितोषिक समारंभ उद्या दि. 22 जानेवारी 2019 रोजी राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात विविध विभागाकडून योजनांच्या माहितीचे चित्ररथ सहभागी होतात. गेल्या वर्षी 26 जानेवारी 2018 च्या कार्यक्रमात 13 विभागांचे रथ सहभागी झाले होते. या चित्ररथांची पाहणी करून गुणांकनाच्या आधारे पहिले तीन क्रमांक घोषित करण्यात आले आहेत. त्यामध्ये दुसरा क्रमांक मुंबई प्रादेशिक विकास प्राधिकरणास तर तिसरा क्रमांक महसूल व वन विभाग (वने) यांना मिळाले आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या, मंगळवार दि. 22 जानेवारी रोजी विधानमंडळात राजशिष्टाचार मंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget