(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ग्राहक जागृती प्रदर्शन व ग्राहक मेळाव्यात ग्राहक कार्यकर्त्यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार | मराठी १ नंबर बातम्या

ग्राहक जागृती प्रदर्शन व ग्राहक मेळाव्यात ग्राहक कार्यकर्त्यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार

मुंबई ( २१ जानेवारी २०१९ ) : ग्राहक चळवळीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरिश बापट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 22 जानेवारी रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदीर सभागृहात संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुंबई शहर पालक मंत्री सुभाष देसाई, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रसाद लाड आणि सदा सरवणकर आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

ग्राहकांच्या हक्काची आणि जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी शासनामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. दरवर्षी 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने राज्यभर ग्राहक जागृती पंधरवाडा आणि इतर उपक्रम राबविण्यात येतात. या वर्षी देखील सुमारे 300 तालुक्यांमधून ग्राहक जागृकतेचे कार्यक्रम घेण्यात आले. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून ग्राहक जागृती संदर्भातील प्रदर्शनाचे व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्‍घाटन मंगळवारी सकाळी 12 वाजता शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक, दिलीप शिंदे यांच्या हस्ते होईल. यावेळी सार्वजनिक वितरण प्रणाली मधील लाभार्थ्यासाठी झालेले नवीन बदल, ग्राहक संरक्षण परिषद सदस्यांचा क्रियाशील सहभाग, अन्नभेसळ रोखण्यासाठी केलेले विविध उपक्रम, नियमात आणि अमंलबजावणी मध्ये केलेले ग्राहक हिताचे बदल, वैधमापन शास्त्र कायदा अंमलबजावणी मध्ये केलेले ग्राहक हिताचे बदल, राज्य तक्रार निवारण आणि कायद्यातील नवे बदल, या विषयांवर तज्ज्ञांद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण परिषदेचे धनंजय गायकवाड, अन्न व औषध प्रशासन आयुक्त‍ श्रीमती पल्लवी दराडे, हे मार्गदर्शन करणार आहेत.

यावर्षी केंद्र शासनाकडून “ग्राहक तक्रारीचे वेळेवर निरसन”(Timely disposal of consumer complaints) संकल्पना ठरविण्यात आली आहे. या प्रदर्शनात अन्न व नागरी पुरवठा विभाग, अन्न व औषध प्रशासन, वैधमापन विभाग, बेस्ट विभाग,पोलीस विभाग, पेट्रोल आणि तेल संस्था, गॅस पुरवठादार, परिवहन तसेच ग्राहकांशी संबधित इतर संस्था यात सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनातून ग्राहकांना फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. अशी माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत आता ग्राहकांना बॅंकीग सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यस बॅंकचे “व्यावसायिक प्रतिनिधी” म्हणून दुकानदारांना काम करता येणार आहे. पॉस मशिनच्या माध्यमातून बॅंक खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, पैसे काढणे आणि इतर मुल्य वर्धित बॅंकींग सेवा ग्राहकांना मिळणार आहेत. शिधावाटप दुकानदारांमार्फत बॅंकीग सेवा पुरविण्याच्या या उपक्रमाचाही या कार्यक्रमात शुभारंभ होणार आहे.

या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget