मुंबई ( २३ जानेवारी २०१९ ) : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर निवासस्थानाच्या जागेचे ताबापत्र व करारनामा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारक न्यासाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले.
दादरमधील महापौर निवासस्थान येथे झालेल्या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जागेचे ताबापत्र ठाकरे यांना दिले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार पूनम महाजन, चंद्रकांत खैरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर निवासस्थानात मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरे यांच्या हस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले. सुमारे अडीच हजार चौरस फुटांच्या या बंगल्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक साकारण्यात येणार आहे. त्यासाठी या जागेचे ताबापत्र आज स्मारक न्यासाकडे हस्तांतरित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा