(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मेरीटाईम मुंबई ॲन ओडिसी या माहितीपटाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन | मराठी १ नंबर बातम्या

मेरीटाईम मुंबई ॲन ओडिसी या माहितीपटाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई ( २० जानेवारी २०१९ ) : नाविक दलाची महती व मुंबईचा इतिहास वजा ओळख असलेल्या ‘मेरीटाईम मुंबई ॲन ओडिसी’ या माहितीपटाचे सादरीकरण राज्यातील सर्व विद्यापिठातून व्हावे, ज्यायोगे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये जागृती होऊन त्यांना आपल्या नाविक दलाचा गौरवशाली इतिहास समजेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

कुलाबा नेव्हीनगर येथील नाविक दल व वेस्टर्न कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथरा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या माहितीपटाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित यांच्यासह नाविक दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सागरी सुरक्षेचे महत्व ओळखून विजयदुर्गसारखे किल्ले निर्माण केले. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यासारखे आरमारप्रमुख तयार करून सागरी किनाऱ्यांचे रक्षण केले. देशाची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळख असलेले मुंबई हे शहर सर्व धर्मियांना सामावून घेणारे शहरदेखील आहे. या शहराला लाभलेला अथांग समुद्र किनाऱ्यामुळे वैभवात भर पडली आहे. नाविक दलाला त्यामुळे आपली कामगिरी करण्यास मोठा वाव मिळाला आहे.

हा माहितीपट अत्यंत माहितीयुक्त असून याचा लाभ सर्वांना होईल, असे सांगून त्यांनी माहितीपटाच्या निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व संशोधकाचे अभिनंदन केले.

यावेळी राज्यपाल राव यांच्या हस्ते माहितीपटाच्या डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकातून व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथरा यांनी माहितीपटाची माहिती दिली. या माहितीपटाची निर्मिती इनार कॅपिटलचे चेअरमन श्याम सिंघानिया यांनी तर दिग्दर्शन साकेत बहल यांनी केले आहे. समारंभाला नाविक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget