मुंबई ( २३ जानेवारी २०१९ ) : राज्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या व नव्याने राबविण्यात येणाऱ्या सर्वच पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालविण्यात येणार आहेत. यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
राज्यातील पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालविण्याबाबत आढावा बैठक नुकतीच मंत्रालयात झाली त्यावेळी लोणीकर बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी लोणीकर म्हणाले, राज्यातील 5 ते 10 एच.पी. पर्यंतच्या सर्वच पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जावर चालविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याचा प्रत्येक आठवड्यात प्रगती अहवाल सादर करावा. सौर ऊर्जेचा प्रकल्प राबविताना ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी त्याचे नियोजन करा. जर जागा उपलब्ध नसेल तर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जागेचा प्रश्न मार्गी लावा, अशा सूचना लोणीकर यांनी यावेळी दिल्या.
पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालविल्यामुळे ग्रामपंचायतींचे मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजना राबविण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, आणि विभागीय पातळीवर कामाचे नियोजन करावे, असे निर्देश लोणीकर यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा