(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यातील 17 पाणी पुरवठा योजनांना मंजुरी - बबनराव लोणीकर | मराठी १ नंबर बातम्या

राज्यातील 17 पाणी पुरवठा योजनांना मंजुरी - बबनराव लोणीकर

मुंबई ( २३ जानेवारी २०१९ ) :  : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत एकूण 50 कोटी रुपयांच्या 17 पाणी पुरवठा योजनांना मंजुरी दिली असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 2018-19 च्या कृती आराखड्यातील नळ पाणी पुरवठा योजनांचा दरडोई खर्च 100 टक्क्याहून अधिक असलेल्या योजनांना मान्यता देण्यासाठी उच्चधिकार समितीची बैठक नुकतीच मंत्रालयात झाली. त्यावेळी लोणीकर बोलत होते.

यावेळी लोणीकर म्हणाले, या सर्व योजनांची कामे तत्काळ सुरु करुन ती गुणवत्ता पूर्ण होतील याची दक्षता घ्या. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या योजनानमध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील गार, सोनवडी, नानवीज पाणी पुरवठा योजनेला 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर बारामती तालुक्यातील मुर्टी पाणी पुरवठा योजनेला 23 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नाईक नगर, सार्वे बु. प्र. लो. जामणे, सांगवी, बु. प्र. लो. जामणे या योजनांसाठी 3 कोटी 60 लाख रु मंजूर केले आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर मधील होणीहिप्परगा, मोर्तळवाडी,धडकनाळ तर निलंगा तालुक्यातील जेवरी, हनुमंतवाडी आणि अहमदपूर तालुक्यातील केंद्रवाडी या गावांच्या पाणी पुरवठा योजनांना जवळपास 5 कोटी रु मंजूर करण्यात आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावमधील फर्दापूर पाणी पुरवठा योजनेसाठी 85 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दयाळ, भडवलकरवाडी, देवसडे या गावांच्या योजनांसाठी 80 लाख रूपये मंजूर केले आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिंदेवाडी तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील तांदुळवाडी, पिंपरी धनगर या गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी 2 कोटी 51 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 17 पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून डोंगराळ भागातील वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा कायमचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget