पुणे (१७ जानेवारी २०१९) : महाराष्ट्राने १७ वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही विभागात सुवर्णपदक जिंकून वर्चस्व गाजविले. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने अलाहिदा डावानंतर दिल्लीचे आव्हान १९-१७ असे परतविले. मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशवर १९-८ असा दणदणीत विजय मिळविला.
पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. भर उन्हातही भरपूर प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेला महाराष्ट्र व दिल्ली हा सामना कमालीचा रंगतदार झाला. महाराष्ट्राने पूर्वार्धात ७-५ अशी आघाडी घेतली होती, तथापी दिल्लीने पूर्ण वेळेत १२-१२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना अलाहिदा डावावर गेला. या डावात महाराष्ट्राच्या जान्हवी पेठे हिने शेवटची दोन मिनिटे नाबाद पळती करीत संघास सनसनाटी विजेतेपद मिळवून दिले. महाराष्ट्राकडून किरण शिंदे (पहिल्या डावात ३ मि. २० सेकंद), अश्विानी मोरे (पहिल्या डावात २ मि. दुसºया डावात २ मि. ५० सेकंद), जान्हवी पेठे (पहिल्या डावात १ मि. ४० सेकंद, दुसऱ्या डावात १ मिनिट व अलाहिदा डावात नाबाद २ मिनिटे व एक गडी) यांनी उल्लेखनीय खेळ केला. त्यांना कर्णधार दीक्षा सोनसूरकर (१ मि. १० सेकंद व ५ गडी), श्रुती शिंदे (साडेतीन मिनिटे व एक गडी) यांनी चांगली साथ दिली. दिल्ली संघाकडून शहनाझ (पहिल्या दोन डावात प्रत्येकी १ मि. ४० सेकंद, अलाहिदा डावात दीड मिनिटे तसेच २ गडी), मनूकुमारी (दुसºया डावात २ मि. , अलाहिदा डावात १ मि. ५० सेकंद), सोमिया व दिव्या (प्रत्येकी तीन गडी) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
जिंकून देण्याचेच ध्येय
अलाहिदा डावात शेवटची दोन मिनिटे पळती करण्याची माझ्यावर जबाबदारी होती. मी जर लवकर बाद झाले तर आणखी एक गडी बाद होऊन सामना सडनडेथवर जाण्याची शक्यता होती. ते टाळण्यासाठी मी माझ्या शैलीने खेळत राहिले. ती दोन मिनिटे माझ्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वाटत होती असे सांगून जान्हवी म्हणाली, दुसºया डावात दिल्ली संघाचे आक्रमण चांगले झाले होते. हे लक्षात घेऊन मी शक्यतो त्यांच्या खेळाडूंकडून कशा चुका होतील यावर भर दिला. जान्हवी ही मूळची सोलापूर जिल्हयातील मोहोळ तालुक्यामधील खंडोबाची वाडी येथील रहिवासी आहे. तिचे वडील बसवाहक आहेत. खो खो खेळासाठी ती उस्मानाबाद येथे राहते. तिने आतापर्यंत पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
मुष्टीयुद्ध : महाराष्ट्राचा आकाश, देविका अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या आकाश गोरखा, देविका घोरपडे यांच्यासह पाच खेळाडूंनी मुष्टीयुद्धात अंतिम फेरी गाठली आणि सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या. महाराष्ट्राने १७ व २१ वर्षालील मुले व मुली या चार गटांत मिळून २१ पदके निश्चित केली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा