मुंबई ( ५ फेब्रुवारी २०१९ ) : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2019 चे पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन येत्या 25 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. आज विधानसभा व विधान परिषदेची कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली त्यात विधिमंडळाच्या कामकाजाची चर्चा करण्यात आली.
अधिवेशनाचे कामकाज दि. 2 मार्च 2019 पर्यंत चालणार आहे. सन 2019-2020 चा अंतरिम अर्थसंकल्प बुधवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. शनिवार दि. 2 मार्च रोजी दुष्काळावर चर्चा करण्यासाठी या दिवशी कामकाज सुरु राहणार आहे. या अधिवेशनकाळामध्ये विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयके , तर विधानपरिषदेचे एक प्रलंबित विधेयक मांडण्यात
येणार आहे.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तर विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा