मुंबई, दि. 20 : मुंबईतील सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून मान्यता देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आगामी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडण्यासही आज मंजुरी देण्यात आली.
या विद्यापीठाचे सोमय्या विद्यविहार, के. जे. सोमय्या ट्रस्ट व दि सोमय्या ट्रस्ट हे संयुक्त प्रायोजक मंडळ राहणार असून या विद्यापीठात विविध विद्याशाखा तसेच आंतरशाखीय अध्यापन, सक्षमता, कौशल्य विकास आणि संशोधन व विकास यांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, सामाजिक पुनर्रचना आणि परिवर्तन यासाठी नवीन मार्ग शोधून त्याद्वारे सर्जनशीलता, अभिनव उपक्रम आणि उद्यमशीलता वाढावी यासाठी नवनवीन शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यासाठी स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना मान्यता देण्यात येत असून सोमय्या विद्यापीठाच्या माध्यमातून उच्च शिक्षण अधिकाधिक विस्तारित करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा