(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

बीड, दि.23 : राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वारसा जपताना राज्य शासनाने पत्रकार आणि वृत्तपत्रांच्या संदर्भातील महत्त्वाच्या विषयांना न्याय देऊन अतिशय चांगले निर्णय घेतल्याने महाराष्ट्र राज्य मराठी
पत्रकार संघ, मुंबईच्या बीड शाखेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थित सामुदायिक सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकार संघाचे प्रदेश
कार्याध्यक्ष, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे, संघाचे विश्वस्त संतोष मानुरकर, आत्मलिंग शेटे, प्रशांत जोशी आदींनी मुख्यमंत्र्यांना सन्मानपत्र व प्रतिमा देऊन सत्कार केला.

यावेळी पालकमंत्री पंकजाताई मुंडे, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर, खासदार प्रितम मुंडे, सिनेअभिनेते अक्षयकुमार आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने नुकतीच ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू केली आहे त्याचबरोबर दर्पण पुरस्कार,लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार आदींच्या माध्यमातून सकारात्मक पत्रकारितेला चालना दिली. वृत्तपत्रांसाठी नवीन जाहिरात धोरण तसेच पत्रकारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्यासह, पत्रकारांच्या प्रश्नांबाबत विविध प्रकारचे निर्णय घेतल्याने त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget