मुंबई, दि. 20 : पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षा- 2016 मधील मूळ मागणी पत्राव्यतिरिक्त गुणवत्ता यादीतील अतिरिक्त उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
शासनाकडून 2016 मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित परीक्षेच्या माध्यमातून यापूर्वी 982 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील आणखी 636 उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे कोट्यातील वेळोवेळी रिक्त होणाऱ्या पदांवर टप्प्याटप्प्याने सामावून घेण्यात येणार आहे. हा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांच्या निदर्शनास आणून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा