मुंबई ( २९ जानेवारी २०१९ ) :
औद्योगिक वापरासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा वापर (नझूल जमिनी वगळून) अधिमुल्य आकारुन इतर कारणांसाठी करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे अशा प्रकारच्या जमिनी विकास प्रक्रियेत सामावून घेण्यास मदत होणार आहे.
विशिष्ट प्रयोजनासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा मंजूर प्रयोजनाऐवजी अन्य प्रयोजनासाठी वापर करण्यास परवानगी देण्यासंबंधीच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील प्रस्तावांना शासनाची मान्यता घेणे आवश्यक राहणार आहे. उर्वरित क्षेत्रातील अशा प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना राहणार आहेत. औद्योगिक घटकांना शासनाचे भूसंपादन कायद्यानुसार संपादित करून दिलेल्या जमिनींसाठी हे धोरण लागू होणार नाही. त्यासाठी यापूर्वीचीच शासकीय पद्धती अवलंबण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा