(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अर्थंसंकल्पातून टेन ट्रिलीयन डॉलर ईकॉनामीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या

अर्थंसंकल्पातून टेन ट्रिलीयन डॉलर ईकॉनामीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( ८ फेब्रुवारी २०१९ ) : विकसित देशांच्या पंक्तीकडे मार्गक्रमित युवा भारताला आणखी सशक्त करण्याच्या दृष्टिने अंतरीम अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे. यामुळे भारताचे टेन ट्रिलीयन डॉलर ईकॉनामीचे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

बॅाम्बे स्टॅाक एक्स्चेंजच्यावतीने आयोजित पोस्ट बजेट इंटरअॅक्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केद्रींय अर्थमंत्री पियुष गोयल, केंद्रीय बॅंकिंग व वित्त विभागाचे सचिव राजीव कुमार, सीआयआयचे सरचिटणीस चंद्रजीत बॅनर्जी, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वित्तीय क्षेत्राच्या दृष्टिने सुधारणांचे ठोस पावले उचलण्यात आल्याने, भारताच्या विकास दरात लक्षणीय अशी वाढ पाहता आली. यामुळे भारताकडे वेगाने विकसित होणारी अर्थसत्ता म्हणून जग पाहू लागले आहे. गरीबी निर्मुलनाच्या दृष्टिकोनातील बदल म्हणूनही आपण या या अर्थसंकल्पाकडे पाहू शकतो. अन्न सुरक्षा, शिक्षण सुरक्षा अशा विविध वित्तीय तरतुदी करण्याच्या पलिकडे जाऊन गुंतवणूक आधारित भूमिका घेतल्याने विविध घटकांना सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्याबाबत विचार केला गेला आहे. आगामी काही दशकात भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश असेल. या वैशिष्ट्याचा पुरेपूर विनियोग करता यावा या पध्दतीने या अर्थसंकल्पाची मांडणी आहे. यातूनच भारताचे टेन ट्रिलीयन उद्दिष्ट साध्य करणाऱ्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या क्षेत्रांचा विचार केला गेला आहे.

फडणवीस म्हणाले, कृषी क्षेत्रासाठीच्या मदत व पुनर्वसन या पारंपरिक दृष्टिकोना ऐवजी या क्षेत्राच्या शाश्वत विकासाचे धोरण निश्चित केले आहे. या अंतर्गत सिंचनासाठीची गुंतवणूक, शेतमाल खरेदीबाबतचा अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले. नागरी व ग्रामीण क्षेत्रातील गृहनिर्माण तसेच स्वच्छ भारत अभियानामुळे ही रोजगार निर्मिती झाली. यासर्वांमुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

गतकाही वर्षात महाराष्ट्राने शेतमाल खरेदी, शौचालय निर्मिती, गृहनिर्माण यात अभूतभूर्व असे उद्दिष्ट साध्य केल्याचेही, फडणवीस यांनी नमूद केले.

केंद्रीय अर्थमंत्री गोयल म्हणाले, अर्थसंकल्पात शेतकरी, असंघटीत क्षेत्रातील घटकांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. या घटकांपर्यत आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी रस्ते या पायाभूत सुविधा पोहचाव्यात, असे प्रयत्न आहेत. गाव हा घटक केंद्रीभूत ठेवून, ग्रामविकासाच्या संकल्पनाबरोबच तेथपर्यंत डिजीटल टेक्नॉलॉजीच्या आधुनिक सुविधा पोहचाव्यात असे धोरण आहे. त्यासाठी कर्तव्य, निष्ठा आणि समर्पणच्या भावनेतून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

केंद्रीय सचिव राजीव कुमार यांनी गतकाही वर्षातील उपाययोजनांमुळे देशातील वित्तीय संरचना बळकट झाल्याबाबत मांडणी केली.

बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक चौहान यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते "टेंम्पल ऑफ वेल्थ" या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमास उद्योग, व्यापार तसेच बँकींग, गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget