(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार शुक्रवारी पुण्यात वितरण | मराठी १ नंबर बातम्या

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार शुक्रवारी पुण्यात वितरण

मुंबई ( १२ फेब्रुवारी २०१९ ) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने देण्यात येणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दि.15 फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालय, 896, क्वार्टर गेट चौकाजवळ, नाना पेठ, अहिल्याश्रम, पुणे-2, येथे होणार आहे.

हा पुरस्कार ग्रामविकास, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित राहणार आहेत.

सन 2018-19 या वर्षाकरिता कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती गटात अजयकुमार नेमीचंद मुनोत, लासूर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद तसेच संस्था गटात खानदेश युवा फाऊंडेशन, मु. पो. दहिवेल, ता. साक्री, जि. धुळे यांना देण्यात येणार आहे.

सन 2017-18 व 2018-19 करिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या 50 व्यक्तींना व 12 संस्थांना देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय आजच निर्गमित करण्यात आला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget