(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कतारचे कौन्सुलेट जनरल यांनी घेतली पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट | मराठी १ नंबर बातम्या

कतारचे कौन्सुलेट जनरल यांनी घेतली पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट

मुंबई ( १३ फेब्रुवारी २०१९ ) : कतारचे कौन्सुलेट जनरल सैफ बीन अली अल मोहन्नदी यांनी आज राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी कतार आणि महाराष्ट्रादरम्यान पर्यटनविषयक देवाण - घेवाण करण्यासंदर्भात चर्चा झाली. राज्यातील विविध पर्यटनस्थळांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.

राज्याच्या पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, कतार नॅशनल बँकेच्या भारत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गुप्ता, अर्थतज्ज्ञ गाझी ए. ओ. फयाज, जनसंपर्क अधिकारी शेख इलियास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मंत्री रावल म्हणाले, राज्याला मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला असून भौगिलिक विविधतेने सजलेले महाराष्ट्र राज्य आहे. समुद्र किनाऱ्यापासून ते जंगलांपर्यंत विविध प्रकारची पर्यटन स्थळे राज्यात आहेत. कतार देशात घोड्यांविषयी मोठे आकर्षण असून तेथील नागरिकांना महाराष्ट्रात सारंगखेडा येथे दरवर्षी आयोजित होणारा चेतक महोत्सव निश्चितच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरु शकेल. यादृष्टीने कतारमधील पर्यटकांना चेतक महोत्सवासह महाराष्ट्रातील इतर पर्यटन स्थळांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मंत्री रावल यांच्या हस्ते भेटवस्तू तसेच राज्यातील पर्यटनस्थळांच्या माहितीच्या पुस्तकांचा संच देऊन कौन्सुलेट जनरल सैफ बीन अली अल मोहन्नदी यांना सन्मानित करण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget