मुंबई ( २९ जानेवारी २०१९ ) :
राज्यातील शेतकऱ्यांना वाढीव वीजदराचा फटका बसू नये यासाठी उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना प्रति युनिट १ रुपया १६ पैसे असा सवलतीचा वीजदर लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पूर्वलक्षी प्रभावाने १ नोव्हेंबर २०१६ पासून मार्च २०२० पर्यंत हा वीजदर लागू राहणार आहे. या दरामुळे महावितरणवर पडणाऱ्या आर्थिक भाराच्या प्रतिपूर्तीसाठी महावितरणला शासनाकडून १०७ कोटी ७३ लाख रूपये देण्यात येणार आहेत.
नदीपासून फक्त ५० मीटर उंचीपर्यंत कालव्याद्वारे पाणी पोहोचविता येते. परंतु ५० मीटर ते २०० मीटर उंचीपर्यंत २ ते ५ टप्प्यात पाणी पोहोचविण्यासाठी अनेक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी संस्थांची स्थापना करून उपसा जलसिंचन योजना सुरू केल्या आहेत. या योजना सुरू करण्यासाठी त्यांनी बॅंकांकडून कर्जे घेतली आहेत. या योजनांचा वीजदर वाढविल्यास त्याचा परिणाम योजनांची कार्यक्षमता आणि शेती उत्पादनावर होईल. त्यामुळे या योजनांसाठी सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला.

टिप्पणी पोस्ट करा