(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); घाटकोपरमध्ये 11 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होमगार्ड नोंदणी मोहीम | मराठी १ नंबर बातम्या

घाटकोपरमध्ये 11 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होमगार्ड नोंदणी मोहीम

मुंबई ( ४ फेब्रुवारी २०१९ ) : राज्य गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) वतीने 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान नवीन होमगार्ड सदस्यांच्या नोंदणीस सुरूवात होणार आहे. घाटकोपर येथील लोहमार्ग आयुक्तालयाच्या आवारात सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीत ही नोंदणी मोहीम होणार आहे. होमगार्डसाठी जास्तीत जास्त युवकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या नोंदणीसाठी उमेदवाराची पात्रता पुढील प्रमाणे – उमेदवार कमीत कमी 10 वी पास असावा, वय 20 ते 50 वर्षे, पुरुषांसाठी उंची 162 सेंमी. छाती न फुगविता कमीत कमी 76 सेंमी व 5 सेंमी फुगली पाहिजे, धावणे चाचणी 1600 मीटर. महिलांसाठी उंची 150 सेंमी व 800 मीटर धावणे. बृहन्मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय दृष्ट्या उमेदवार यासाठी नोंदणी करू शकतात. उमेदवाराने येताना सोबत पासपोर्ट आकाराची चार छायाचित्रे आणावीत, असे होमगार्ड विभागाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget