(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी संस्था पुरस्कार जाहीर | मराठी १ नंबर बातम्या

आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी संस्था पुरस्कार जाहीर

मुंबई ( १६ फेब्रुवारी २०१९ ) : महाराष्ट्र राज्यात आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना व सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येणारे आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार जाहीर झाले आहेत.

या पुरस्काराबद्दल सर्व पुरस्कार्थीची आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम तसेच विभागाचे प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी अभिनंदन केले आहे.

पुरस्काराचे स्वरुप

आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त व्यक्तीस 25 हजार रुपये व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार विजेत्या संस्थेस 50 हजार रुपये रकमेचा पुरस्कार देण्यात येतो. 2017-18 या वर्षात अपरिहार्य कारणास्तव हा पुरस्कार देण्यात आला नव्हता त्यामुळे 2017-18 व 2018-19 या दोन्ही वर्षाचा पुरस्कार जाहीर झाला असून 30 व्यक्तींना आदिवासी सेवक व 9 संस्थांना आदिवासी सेवा संस्था पुरस्कार घो‍षित करण्यात आला आहे.

पुरस्कारार्थीं

आदिवासी सेवक पुरस्कारार्थीं : प्रशांत सिताराम भदाणे (जि.नाशिक), डॉ.जयदिप दौलतराव निकम (जि.नाशिक), देवेंद्र मुरलीधर गायकवाड (जि.नाशिक), अनाजी काळू गवळी (जि.नाशिक), नामदेव ज्ञानदेव भोसले (जि.पुणे), रविंद्र उमाकांत तळपे (जि.पुणे), जयराम नारायण भोईर (जि.ठाणे), सोनु धवळू म्हसे (जि.पालघर), श्रावण पोट्या कुवरा (जि.पालघर), श्रीमती मिराबाई परशुराम महाले (जि.पालघर), अभिजित रमेश देशपांडे (जि.पालघर), शिंदा सुरेश बेंड्या (जि.पालघर), सुदाम भिवसन पाटील (जि.पालघर), रविंद्र अरविंद लिमये (जि.रायगड), महादेव जयराम जोशी (जि.ठाणे), निलेश पुनमचंद सोमाणी (जि.वाशिम), मोहन चौधरी (जि.वाशिम), आरीकर दुर्गेश किसन (जि.चंद्रपूर), गेडाम वाघुजी पोचीराम (जि.चंद्रपूर), राजगडकर मारोती गिरीधरराव (जि.यवतमाळ), अशोक श्रावण उईके (जि.भंडारा), श्रीमती प्रभा चमरु पेंदाम (जि.भंडारा), ह.भ.प.दत्तात्रम श्रावण कुंमरे (जि. गडचिरोली) शंकरलाल गुणोजी मडावी (जि.गोंदिया), धुर्वे श्याम देवराम (जि. नागपूर), डॉ.तुळशीराम बुधा गावीत (जि.धुळे), नाजुक मुकुंदा कुंभरे (जि.गोंदिया), लक्ष्मीकांत स.दांडेकर (बोरीवली, मुंबई), राजेश शेकु काळे (जि.सोलापूर) आणि संजय दामोदर देवधर (जि.नाशिक).

आदिवासी सेवा संस्था पुरस्कार्थीं वनवासी कल्याण आश्रम, गुही.ता.सुरगाणा, जि.नाशिक, सोशल नेटवर्कींग फोरम नाशिक, स्वातंत्र सैनिक रेवजीभाई चौधरी सामाजिक प्रतिष्ठान, मु.खरवंद, ता.जव्हार, जि.पालघर, लजपतराय मेहरा न्युरो थेरेपी रिसर्च ॲण्ड इन्सिट्यूट, सूर्यमाळ, ता.मोखडा, जि.पालघर, वयम चळवळ, ता.जव्हार, जि.पालघर, हिंदु सेवा संघ, टिळक चौक कल्याण, जि.ठाणे, वनवासी कल्याण आश्रम संचलित कै.विजयाताई गांधी माध्यमिक आश्रम शाळा, उत्तेकोल,ता.माणगांव, जि.रायगड, पंडीत दिनदयाळ उपाध्ये शिक्षण संस्था, यवतमाळ आणि ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, जि.भंडारा.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget