(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कर्णबधीर व मुकबधीर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराची सात दिवसात चौकशी करणार - संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट | मराठी १ नंबर बातम्या

कर्णबधीर व मुकबधीर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराची सात दिवसात चौकशी करणार - संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट

मुंबई, दि. 26 : पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या कर्णबधीर व मुकबधीर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या प्रकरणाची सात दिवसात
चौकशी केली जाईल. त्यातील दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे संसदीय कार्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज विधानसभेत सांगितले.

लातूर, नाशिक विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

दरम्यान, यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत निवेदन केले. ते म्हणाले, राज्यातील कर्णबधीर व मुकबधीर विद्यार्थ्यांच्या मागण्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेवून काही
प्रमुख मागण्यांची पूर्तता केली आहे. मुकबधीरांच्या उच्च शिक्षणकरिता उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्याची मागणी होती. सध्या पाच विभागात ही विद्यालये सुरु असून लातूर आणि नाशिक विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

विद्यालय सुरु करण्याबाबत सक्षम संस्थेला मान्यता देताना कर्णबधीर व मुकबधीर संघटनेच्या प्रतिनिधींचे मत विचारात घेतले जाईल. तसेच पदांच्या निश्चितीसाठी असलेल्या तज्ज्ञ समितीमध्ये या संघटनेच्या दोन
प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य शासकीय विद्यालयांमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. दिव्यांगाकरिता शासकीय नोकरीसाठी आरक्ष‍ित पदांवर अंध, मुकबधीर, अस्थिव्यंग उमेदवार उपलब्ध झाल्यास आणि तो पात्र ठरल्यास त्यामधून अंध, मुकबधीर प्रवर्गातील उमेदवारास नियुक्ती देताना प्राधान्य दिले जाईल. मुकबधीर व्यक्तीस सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने पात्र ठरविल्यानंतर त्याला वाहनचालक परवाना देण्यात येईल. मुकबधीर प्रवर्गातून नियुक्ती झालेल्यांची बेरा तपासणी करण्याबाबत
सामान्य प्रशासन व आरोग्य विभागामार्फत आठ दिवसात परिपत्रक काढले जाईल.

अन्य मागण्यासंर्भात हे अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घेतली जाईल, असेही बडोले यांनी यावेळी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget