(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : मुंबई शहर सीसीटीव्ही प्रकल्पामध्ये आणखी 5 हजार 625 कॅमेऱ्यांची भर | मराठी १ नंबर बातम्या

मंत्रिमंडळ बैठक : मुंबई शहर सीसीटीव्ही प्रकल्पामध्ये आणखी 5 हजार 625 कॅमेऱ्यांची भर

मुंबई ( २९ जानेवारी २०१९ ) : मुंबई शहर सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पांतर्गत महानगरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हा प्रकल्प अधिक व्यापक व प्रभावी करण्यासाठी शहरात अतिरिक्त 5 हजार 625 कॅमेरे बसविण्यास व त्यासाठी 323 कोटी 23 लाख रुपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुंबई शहर सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पांतर्गत, मुंबई शहरामध्ये यापूर्वी 1 हजार 510 ठिकाणी मिळून 4 हजार 717 सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे. प्रकल्पाच्या करारातील तरतुदीनुसार, मुंबई शहरात अतिरिक्त 5 हजार 625 कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण 323 कोटी 23 लाखांचा खर्च होणार आहे. या खर्चामध्ये खोदकाम परवानगी, प्रत्यक्ष खोदकाम खर्च आणि खोदकामानंतर रस्ते पूर्ववत करणे यांचा समावेश नाही. प्रकल्पाच्या करारातील तरतूदी व तांत्रिक बाबी विचारात घेऊन उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीने घेतलेल्या निर्णयानुसार एल ॲण्ड टी कंपनीमार्फत हे काम करण्यात येणार आहे. पूर्वी लावण्यात आलेले 4 हजार 717 कॅमेरे आणि आज मान्यता देण्यात आलेले अतिरिक्त 5 हजार 625 कॅमेरे असे दोन्ही मिळून एकूण कॅमेऱ्यांची संख्या 10 हजार 342 इतकी झाली आहे. त्याच्या एकत्रित 1 हजार 303 कोटी 56 लाख रुपयांच्या प्रकल्प खर्चासदेखील सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुंबई शहर सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पामुळे वाहतुकीचे नियमन करण्यासह कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होत असून अतिरिक्‍त कॅमेऱ्यांमुळे ही क्षमता आणखी विस्तारणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget