(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पोखरापूर उपसा सिंचन योजनेच्या संघर्ष समितीने घेतली विजय शिवतारे आणि आदित्य ठाकरे यांची भेट | मराठी १ नंबर बातम्या

पोखरापूर उपसा सिंचन योजनेच्या संघर्ष समितीने घेतली विजय शिवतारे आणि आदित्य ठाकरे यांची भेट

शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नांसाठी

मुंबई ( १६ फेब्रुवारी २०१९ ) : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी आज जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेवून पोखरापूर उपसा सिंचन योजना आणि आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामासंदर्भात चर्चा केली.

यावेळी शिवतारे म्हणाले, पोखरापूर (ता.मोहोळ) उपसा सिंचन योजनेची माहिती घेवून आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी पोखरापूर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक मंत्रालयात घेण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार ही बैठक झाली. या योजनेबाबतचे संकल्पचित्र तयार झाले असून त्यानूसार अंदाजपत्रक तयार करुन 5 मार्चपूर्वी निविदा प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले.

या प्रकल्पाची अधिक माहिती देताना शिवतारे म्हणाले, पोखरापूर सिंचन योजनेतून मोहोळ तालुक्यातील पोखरापूर, खवणी व सारोळे या गावांना सिंचनाचा लाभ मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. हा प्रकल्प 2001 पासून रखडलेला आहे. या प्रकल्पातून तीन गावातील 585 हेक्टर क्षेत्रासाठी आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा 2 मधून पाणी देण्यास पोखरापूर उपसा सिंचना योजनेस शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजेनेच्या उजव्या कालव्यावरील 13 कि.मी. अंतरावरुन पाणी उचलण्याचे व पोखरापूर वितरण कुंडात पाणी टाकल्यानंतर 6 कि.मी. उजवा व 6 कि.मी. डावा प्रवाही कालवा मुळ नियोजनात होता तो रद्द करुन वितरण कुडांपासून दोन्ही कालवे बंद पाईप लाईनमध्ये परावर्तीत करुन 30 टक्के अधिकचे क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे आदेशही शिवतारे यांनी दिले.

यावेळी ठाकरे म्हणाले, दुष्काळी भागात तीव्र पाणी टंचाई आहे. यावर उपाय म्हणून छोटे छोटे प्रकल्प सुरु झाल्यास पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळेल. विकासकामे करताना आणि पाणी वाटप करताना राजकारण बाजूला ठेवून गरजूंना मदत करण्याचे धोरण स्विकारले पाहिजे. याच बैठकीत पोखरापूर योजनेच्या संघर्ष समितीने आदित्य ठाकरे यांनी पोखरापूर उपसा सिंचन योजना मार्गी लागावी म्हणून बैठक आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन आभार मानले.

यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव आर. व्ही. पानसे, संकल्पचित्र कार्यालयाचे प्रमुख रवींद्र उपासने, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अंसारी, मुख्य अभियंता विलास रजपूत, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे तसेच पोखरापूर उपसा सिंचन योजनेच्या संघर्ष समितीचे सदस्य व शेतकरी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget