मुंबई ( १२ फेब्रुवारी २०१९ ) : राज्यात 2018 च्या खरीप हंगामातील नैसर्गिक परिस्थितीमुळे 151 तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानीपोटी तातडीने मदत वाटप करण्यासाठी 2 हजार कोटींचा आकस्मिकता निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली. यासाठी राज्याच्या आकस्मिक निधीच्या 150 कोटी इतक्या कायमच्या मर्यादेत 2 हजार कोटींनी तात्पुरती वाढ करून ती 2 हजार 150 कोटी इतकी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील 151 तालुक्यांमध्ये गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीबद्दल तातडीने मदत वाटप करण्यासाठी 2 हजार कोटी इतका अतिरिक्त निधी आकस्मिक निधी अग्रिमाद्वारे उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यानुसार आज निर्णय घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा