(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक आधाराकरीता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि स्वीय सहाय्यकांनी ‘भारत के वीर’ नावाचे धनादेश केले सुपूर्द | मराठी १ नंबर बातम्या

शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक आधाराकरीता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि स्वीय सहाय्यकांनी ‘भारत के वीर’ नावाचे धनादेश केले सुपूर्द

· पहिल्याच प्रहरी एक लक्ष रूपयांपेक्षा जास्त मदत जमा

मुंबई ( १८ फेब्रुवारी २०१९ ) : जम्मु-काश्मीरमधील पुलवामा येथील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देण्याचे आपले कर्तव्य आहे. ही सामाजिक भावना लक्षात घेऊन महिला व बालविकास, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आर्थिक आधार देण्याचे आवाहन केले होते.

त्याअनुषंगाने मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी ग्रामविकास, महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पहिल्याच प्रहरी एक लक्ष रूपयापेक्षा जास्त रकमांचे धनादेश अधिकारी-कर्मचारी आणि स्वीय सहाय्यकांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपूर्द केले.

शहीद जवान हे त्यांच्या कुटुंबाचे आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आणि आर्थिक आधार देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. हीच भावना लक्षात घेऊन आपल्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना, ऊमेद व माविमच्या महिला बचतगटांना, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कमीत कमी 21 रूपये देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ‘भारत के वीर’ या नावाने रकमेचा धनादेश देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनीता वेद-सिंघल यांनी 11 हजार रूपये, महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी 14 हजार 300 रूपये, ग्रामविकास विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी 44 हजार 500 रूपये, महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांनी 34 हजार 800 रूपयांचा तसेच मंत्री कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि स्वीय सहाय्यकांनीही मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget