(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आजचे पुरस्कार सोहळे स्थगित नव्या तारखेची नंतर होणार घोषणा | मराठी १ नंबर बातम्या

आजचे पुरस्कार सोहळे स्थगित नव्या तारखेची नंतर होणार घोषणा

मुंबई ( १५ फेब्रुवारी २०१९ ) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पुणे येथील वाघोली येथे दिनांक १४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सव २०१९ आणि तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

पुलवामा, जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून वाघोली येथे होणारा तमाशा महोत्सव हा स्थगित करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ कलाकार मोमीन कवठेकर यांना दिला जाणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार वितरण सोहळा हा देखील रद्द करण्यात आला असून, वितरण सोहळ्याची पुढील तारीख सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत नंतर घोषित करण्यात येणार आहे, असे तावडे यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget