(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ग्रीडच्या (जाळे) कामांना गती देवून राज्यातील गोदामांचा शंभर टक्के वापर करावा - सहकार मंत्री सुभाष देशमुख | मराठी १ नंबर बातम्या

ग्रीडच्या (जाळे) कामांना गती देवून राज्यातील गोदामांचा शंभर टक्के वापर करावा - सहकार मंत्री सुभाष देशमुख

मुंबई ( १३ फेब्रुवारी २०१९ ) : शासनाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कडधान्य, तृणधान्य साठवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांतर्गत असलेल्या गोदामांचे ग्रीड (जाळे) आणि जीआयएस मॅपिंगच्या कामाला गती देऊन या गोदांमाचा शंभर टक्के वापर करावा, असे निर्देश सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

आज मंत्रालयात राज्यातील शासनाच्या विविध विभागाच्या गोदामांचे ग्रीड (जाळे) विकसित करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रतापसिंग, कापूस पणन महसंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन संचालनालय, पणन मंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व्यतिरिक्त दि. महाराष्ट्र स्टेट को- ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई, दि. विदर्भ सहकारी मार्केटिंग फेडरेशन, नागपूर, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ मुबई, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सहकारी संस्था, सहकारी कारखाने, सहकारी सूत गिरण्या, अन्न व नागरी पुरवठा विभाग, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग या विभागांच्या गोदामांचे ग्रीड(जाळे) आणि जीआयएस मॅपिंगच्या कामाला गती द्यावी आणि राज्यातील सहकारी पणन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या अटल महापणन विकास अभियामामध्ये या गोदामांचा शंभर टक्के वापर करावा असेही देशमुख यांनी सांगितले.

गोदामांमध्ये साठवणूक केलेल्या शेतमालांची माहिती संगणकीय प्रणालीमध्ये अद्यावत करून पणन विभागाला आवश्यक असेल तेव्हा सहजरित्या उपलब्ध होईल यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांनी नोडल एजन्सी म्हणून कार्य करावे आणि संबधित सर्व संस्थांनी आपल्या गोदामांची माहिती वखार महामंडळाला तातडीने उपलब्ध करून द्यावे असेही देशमुख यांनी सांगितले

देशातील सायलो (Silo) गोदामांचा आभ्यास करून वखार महामंडळाने राज्यात सायलो गोदाम उभारणीचा पथदर्शी प्रकल्प राबवावा अशा सूचनाही देशमुख यांनी यावेळी दिल्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget