मुंबई ( १५ फेब्रुवारी २०१९ ) : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मार्फत राज्यातील तंत्रनिकेतन संस्थांना सर्वोत्तम प्रयोगशाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षाचे सर्वोत्तम प्रयोगशाळा चे पुरस्कार एकूण ११ संस्थांना घोषित झाले. आज या पुरस्काराचे वितरण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते तंत्रनिकेतन संस्थांना करण्यात आले. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचेमार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी अद्ययावत अभ्यासक्रम तयार करणे व राबविणे त्याचप्रमाणे संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा, यंत्रसामुग्री व मनुष्यबळ यांचा सदुपयोग व दर्जा उंचावण्याकरिता अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत प्रयोगशाळांची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट करण्याकरिता व त्यांचे प्रोत्साहन वाढविण्याकरीता सर्वोत्तम प्रयोगशाळा पुरस्कार २०१४-१५ पासून सुरु केलेले असून, या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम रु. ५० हजार व प्रमाणपत्र असे आहे.
सर्वोत्तम प्रयोगशाळा निवडण्याकरिता प्राथमिक ऑनलाईन फेरीमध्ये संस्थांकडून अर्ज मागविण्यात येतात. ऑनलाईन अर्ज मागविण्याकरिता मागील वर्षाचा संबंधित विभागाचा शैक्षणिक अवेक्षण अहवाल उत्कृष्ट असणे गरजेचे आहे, प्राथमिक चाचणीनंतर पुढील फेरीकरिता पात्र ठरलेल्या संस्थांच्या प्रयोगशाळांना तज्ञ समितीकडून अचानक भेट देऊन प्रत्यक्ष तपासणी करण्यात येते, समितीच्या अहवालानुसार अंतिम पात्र ठरलेल्या संस्थांची निवड करण्यात येते, सदर प्रदान रक्कम संस्थेकडून त्या प्रयोगशाळेचा दर्जा उंचावण्यासाठी वापरण्यात येते आदी अटींची पूर्तता करण्यात येते.

सर्वोत्तम प्रयोगशाळा पुरस्कार २०१५-१६ आणि २०१६-१७ पारितोषिक प्राप्त संस्था
अ.क्र.
|
संस्थेचे नाव
|
प्राचार्याचे नाव
|
१
|
संजय घोडावत पॉलिटेक्निक, हातकणंगले, कोल्हापूर
(२०१५-१६)
|
डॉ. व्ही.व्ही. गिरी, प्राचार्य
|
२
|
संदिप फांउडेशन्स संदिप इस्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, नाशिक (२०१५-१६)
(२०१६-१७)
|
व्ही. एन. निकम, विभागप्रमुख,
स्थापत्य
|
३
|
विद्या प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निक, ठाणे (२०१५-१६)
|
डी. के. नायक, प्राचार्य
|
४
|
संदिप पॉलिटेक्निक, नाशिक (२०१५-१६)
|
एस.एस.राऊत, विभागप्रमुख
|
५
|
सेंट झेवियर्स टेक्नीकल इंस्टिट्यूट, माहिम, मुंबई
(२०१५-१६)
|
एस. बी. घूग्राड, प्राचार्य
|
६
|
सिध्देश्वर वुमेन्स पॉलिटेक्नीक, सोलापूर (२०१५-१६)
|
प्रो. जी. पी. धरणे, प्राचार्य
|
७
|
शासकीय तंत्रनिकेतन, औरंगाबाद (२०१६-१७)
|
एफ. ए. खान, प्राचार्य
|
८
|
श्रीम. सावित्रीबाई फुले पॉलिटेक्निक, पुणे (२०१६-१७)
|
रोहीणी काळे, प्राचार्य
|
९
|
शासकीय तंत्रनिकेतन, नाशिक (२०१६-१७)
|
डी. पी. नाठे, प्राचार्य
|
१०
|
भारती विद्यापीठ इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी मुंबई (२०१६-१७)
|
प्रो. पी. एन. टंडन, प्राचार्य
|
११
|
ठाकूर पॉलिटेक्निक, कांदिवली (पू), मुंबई (२०१६-१७)
|
डॉ. एस.एम.गणेचारी, प्राचार्य
|
टिप्पणी पोस्ट करा