(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सामुहिक वनसंपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा पदविका वितरण समारंभ | मराठी १ नंबर बातम्या

सामुहिक वनसंपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा पदविका वितरण समारंभ

मुंबई, दि. २३ : वनसंवर्धन आणि वन संरक्षण करून आदिवासी समाजाच्या जमिनी मूळ आदिवासी बांधवांना मिळण्यासाठी मदत व्हावी, आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी देशातला पहिला 'सामुहिक वनसंपत्ती व्यवस्थापन' अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ अंतर्गत सुरू करण्यात आला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे या अभ्यासक्रमाचा पहिला पदवीदान समारंभ आदर्श ग्राम योजनेचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार, आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सहसचिव सुनील पाटील, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, सामाजिक कार्यकर्ते व या अभ्यासक्रमाचे निर्माते देवाजी तोफा, अभ्यासक्रम संचालक डॉ. विजय येदलाबादकर, मुंबई विद्यापीठाचे डॉ. निरज हातेकर, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालिका नंदिनी आवडे आदी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, सामुहिक वनसंपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम वनसंवर्धन व वनसंरक्षणासाठी देशाला दिशादर्शक ठरणारा आहे. समुदायाला बरोबर घेऊन प्रशासनाने पाठबळ दिल्याशिवाय कोणतेच काम शक्य नाही. पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांनी योजनांचा परिपूर्ण अभ्यास करून समाजहितासाठी काम करावे. आदर्श गाव योजनेतून आदिवासी गावांचाही विकास शक्य आहे, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. देशाच्या इतिहासात नोंद होईल, असा हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात मुलींचाही सहभाग आहे, आदिवासींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शासन आणि गाव यातील अंतर कमी
करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

वर्मा म्हणाल्या, वन विभाग आणि आदिवासी विभागाने समन्वयाने काम करून लोकसहभागातून आदिवासी बांधवांना जमिनी देण्यासाठी मदत झाली. राज्यात 7 हजार 729 गावांना सामुहिक वनहक्क मिळाले आहेत. शिवाय वैयक्तिक पट्टे देण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू असून यासाठी 29 लाख एकर जमिनींचे
नियोजन करण्यात येत आहे. प्रलंबित दावे त्वरित निकाली काढण्यात येत आहेत. पदविका अभ्यासक्रम हा जागतिक पातळीवरचा अभिनव उपक्रम आहे, असे श्रीमती वर्मा यांनी सांगितले.

डॉ. येदलाबादकर यांनी सांगितले की, गावात राहून काम करणारे व गावाविषयी प्रेम असणारे तरूण ग्रामसभेने निवडले आहेत. कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची अट न ठेवता हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यात 150 युवकांची चाचणी घेऊन 39 उमेदवारांची निवड केली होती, यातील 27 विद्यार्थ्यांना आज पदविका
प्रदान करण्यात आली. यामध्ये तीन मुलींचा सहभाग आहे. विना परीक्षेचा केवळ गृहपाठ, वर्गशिक्षण आणि जंगल अभ्यास यावर आधारित असा हा अभ्यासक्रम आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget