'चार सख्य चोवीस' वाचकांना वाचनाची अनुभूती देईल - विनोद तावडे
मुंबई ( ११ फेब्रुवारी २०१९ ) : चार अनुभवविश्वांचा मिलाफ असणारा चार सख्य चोवीस कथासंग्रह वाचकांना उत्तम वाचनाची अनुभूती देईल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्य मंत्री तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सिडनॅहम महाविदयालयात चार सख्य चोवीस कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेता सचिन खेडेकर, ग्रंथाली प्रकाशन संस्थेचे विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर आणि विश्वस्त लतिका भानुशाली उपस्थित होते. यावेळी कथासंग्रहातील दोन कथांचे वाचन अभिनेता सागर तळाशिकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी केले.
तावडे पुस्तक प्रकाशनाच्या वेळी म्हणाले, रोजच्या दैनंदिन जीवनातील लहानशा गोष्टींचे कथानक आणि मग त्या गोष्टीचे होणारे शब्दरूपीकथन, जबरदस्त निरिक्षणशक्ती याचा प्रत्यय या कथासंग्रहातून होतो. तुम्ही आम्ही दररोज अनेक व्यक्तींना भेटतो तेव्हा घडणाऱ्या प्रसंगांना या कथासंग्रहात चौघी लेखिकांनी बोलके करून लेखणीतून उतरविले आहे. विशेष म्हणजे या चारही लेखिकांचे क्षेत्र आणि अनुभव वेगळे असून त्या एका आगळ्यावेगळ्या निर्मितीसाठी समान धाग्यात बांधल्या आहेत. यावेळी चारही लेखिकांच्या कथांवर तावडे यांनी प्रकाश टाकला. चार सख्य चोवीस कथासंग्रहात अभिनेत्री संपदा जोगळेकर- कुलकर्णी, व्हॉईस थेरपिस्ट आणि स्तंभलेखिका डॉ. सोनाली लोहार, सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या हर्षदा बोरकर आणि मराठीच्या प्राध्यापिका निर्मोही फडके अशा चार लेखिकांच्या प्रत्येकी पाच आणि प्रत्येकी एक विशेष कथा मिळून सहा असे एकूण चोवीस कथा आहेत. हा कथासंग्रह ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केला असून मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ अतुल जोशी यांनी केले आहे. या पुस्तकाला प्रस्तावना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची आहे. कथासंग्रहातील रेखाचित्रे पूजा रायबागी यांनी रेखाटलेली आहेत.
याप्रसंगी तावडे यांनी चारही लेखिकांच्या लेखणीचे कौतुक करून साहित्य क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा