(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पंतप्रधानांनी साधला आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद | मराठी १ नंबर बातम्या

पंतप्रधानांनी साधला आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद

यवतमाळ ( १६ फेब्रुवारी २०१९ ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढरकवडा येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेवून संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. तुम्हाला कोणता आजार आहे, डॉक्टरांनी उपचार कसे केले, आता तब्येत कशी आहे, ही योजना कशी सुरु आहे आदी प्रश्न पंतप्रधानांनी रुग्णांना विचारले. यावेळी पंतप्रधानांना माहिती देताना शंकर धामनकर म्हणाले ही योजना नसती तर आमच्यावर उपचार झाले नसते. आजारावर पैसा खर्च करण्याची ऐपत आमची नव्हती. या योजनेमुळे आम्हाला लाभ झाला असे त्यांनी सांगितले.

तर यावेळी प्रसन्ना जांध या बालकाचे पालक पंतप्रधानांशी संवाद साधतांना म्हणाले, माझ्या तीन महिन्याच्या बाळावर डॉक्टरांनी चांगले उपचार केले. आयुष्यमान भारत या योजनेमुळे माझे बाळ आज सुखरुप आहे, अशी कृतज्ञताही पालकांनी व्यक्त केली. केंद्र शासनाची ही योजना नसती तर आमच्यासारख्या गरीब रुग्णांना आजारावर उपचार घेता आले नसते, असे निलेश गलांडे यांनी सांगितले.

मुख्य सभास्थळी आयोजित आयुष्यमान भारत कक्षामध्ये या योजनेचे एकूण 14 लाभार्थी उपस्थित होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे उपस्थित होत्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget