(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नागरी मैला व्यवस्थापनातून फुलवता येते सुगंधी फुलांची बाग | मराठी १ नंबर बातम्या

नागरी मैला व्यवस्थापनातून फुलवता येते सुगंधी फुलांची बाग

मुंबई ( २ फेब्रुवारी२०१९ ) : घनकचरा व्यवस्थापनेसह नगरातील शौचालयातून निघणाऱ्या लाखो टन मैल्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास यातून सुगंधी फुलांची बाग फुलवता येते असा अनुभव मांडला आहे बंगलोर येथून आलेल्या मानस रथ यांनी! स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणारी सिडीडी सोसायटी या संस्थेचे वरिष्ठ सल्लागार म्हणून ते काम करतात. श्री रथ यांनी सांगितले एका सर्वेक्षणानुसार असे लक्षात आले आहे, आजही ४५ टक्के लोक हे वर्षानुवर्षे सेप्टिक टॅंक स्वच्छ करीत नाहीत. केवळ सोळा टक्के लोक किमान पाच वर्षातून ही टॅन्क साफ होईल याकडे लक्ष पुरवितात.

बंगलोर येथे या बाबीवर काम करण्यात आले. प्रत्येक घरी शौचालय तर तयार करण्याचे ध्येय आहेच मात्र त्यानंतर या मैल्याची विल्हेवाट लावण्याचा तसेच त्याचा उपयोग विधायक कामासाठी करण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला. फिल्टर करून वापरलेल्या मैलाचे खत वापरून बाग तयार करण्यात आली आहे. ही बाग बघताना कुठलीही दुर्गंधी येत नाही हेही त्यांनी सांगितले.

अर्बन प्लॅनर म्हणून काम करणारे असिम मनसुरी यांनी सिन्नर येथे केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, २९ टक्के लोकांकडे शौचालय नव्हते. अशा स्थितीत काम केले. ओपन डेफीकेशन म्हणजे उघड्यावर शौचाला जाणे बंद झाले. यासोबतच घन कचऱ्यासोबतच द्रव कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावल्याबद्दल सिन्नरला ‘ओडीएफ- प्लस प्लस’असे मानांकन मिळाले. लोकसहभाग, स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि खासगी संस्थाच्या भागीदारीतून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.

नाशिकच्या महानगरपालिकेत तयार करण्यात आलेला वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन्ट हा एक अनोखा पुढाकार आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पाबद्दल त्यांचे प्रतिनिधी अभीयंता श्री.माळी यांनी सांगितलेली घन कचकऱ्यातून कमी खर्चात होणारी वीज निर्मिती देखील उल्लेखनीय होती. शहरातील हॉटेल विक्रेत्यांना उरलेले व वाया जाणारे अन्न व्यवस्थित वेगळे करून ते या कामासाठी देण्यासाठी सांगण्यात आले. या प्रकल्पाचा खर्च केवळ आठ लाख इतका अल्प असून याद्वारे ३३ हजार किलोवॅट उर्जा प्रतिदिन तयार होते. गुजरातचे वरिष्ठ शास्त्रज्ञ केतन देसाई यांनी मैला व इतर घनकचऱ्यवर प्रक्रिया करून त्याद्वारे तयार करण्यात येणारे वर्मीकंपोस्ट आणि त्याची उपयुक्तता याबद्दल सांगितले.

वर्मिफीकेशनची प्रक्रीया करून मिळालेल्या खतातून नायट्रोजन, पोटॅशियम, झिंक यासारखे पोषक द्रव्य मिळतात असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सॉईल, वॉटर वेस्ट मॅनेजमेंटसाठी नियम तयार केले असून यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी श्री. आवटे यांनी स्पष्ट केले. नगर विकास विभाग, माहाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महाराष्ट्र स्वच्छ मिशन, निरी, निती आयोग, आणि ‘इराफ- एननायरनमेंटल रिसर्च फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे स्वच्छ भारत अभियान -राज्य स्तरीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.
येत्या २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारतचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मार्गदर्शन करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत नियामक संस्था, तांत्रिक सल्लागार, नागरी व्यवस्थापक,आर्थिक
सल्लागार आदींनी मार्गदर्शन केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget