मुंबई ( ३१ जानेवारी २०१९ ) : सिल्लोड (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27 फेबुवारी 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे,अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. सहारिया यांनी सांगितले की, 5 ते 12 फेब्रुवारी 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. 9 व 10 फेब्रुवारी 2019 या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी 13 फेब्रुवारी 2019 रोजी होईल. मतदान 27 फेबुवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 28 फेबुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
टिप्पणी पोस्ट करा