(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नागपूर जिल्ह्यातील निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेला मंजुरी | मराठी १ नंबर बातम्या

नागपूर जिल्ह्यातील निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

मुंबई ( ३० जानेवारी २०१९ ) : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील निलडोह- डिगडोह गावाच्या पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. योजनेसाठी 44 लक्ष रु मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम 2018 -19 च्या वार्षिक कृती आराखड्यात निलडोह - डिगडोह पाणी पुरवठा योजनेचा समावेश करण्यात आला होता. या योजनेला मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे या गावचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. त्यामुळे योजनेचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश मंत्री श्री. लोणीकर यांनी मंजुरी देताना दिले.

या योजनेला वेन्ना धरणातून पाणी उपलब्ध होणार आहे. 2 हजार 35 ची गावाची लोकसंख्या गृहीत धरून योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात गावाचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

नागपूर शहरापासून जवळ असलेल्या निलडोह-डिगडोह गावाच्या लोकसंख्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अस्तित्वातील पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा पूर्ण होत नव्हता. त्या मुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. या नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे गावकऱ्यांचा पाणी
प्रश्न सुटणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget