(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कोरियाचे नवनियुक्त वाणिज्यदूत राज्यपालांना भेटले | मराठी १ नंबर बातम्या

कोरियाचे नवनियुक्त वाणिज्यदूत राज्यपालांना भेटले

मुंबई ( १८ फेब्रुवारी २०१९ ) : कोरियन गणराज्याचे (दक्षिण कोरिया) मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत डॉंगयंग किम यांनी सोमवारी (दिनांक १८) रोजी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

कोरियाच्या एलजी, स्यामसंग, ह्यूनडए, जीएस कॅल्टक्स कॉर्पोरेशन, बुसान बँक, यांसह अनेक कंपन्या महाराष्ट्रात काम करीत असून त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी नसल्याचे डॉंगयंग किम यांनी राज्यपालांना सांगितले.

कोरियाचे ९०० विद्यार्थी पुणे येथे शिकत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. वाणिज्यदूत या नात्याने आपले कार्यक्षेत्र महाराष्ट्रासह, गुजरात, तेलंगण, गोवा व मध्य प्रदेश हे आहे. तेथील कोरियन नागरिकांचे हित जपताना महाराष्ट्र व कोरिया यांमध्ये व्यापार, सांस्कृतिक संबंध व विद्यार्थी देवाण- घेवाण वाढविण्यासाठी आपण काम करण्यार असल्याचे डॉंगयंग यांनी सांगितले.

भारतातून अनेक पर्यटक जपान मध्ये येतात, परंतु कोरियाबदल त्यांना माहिती नसल्यामुळे पर्यटक कोरियाला येत नाही. त्यामुळे उभय देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उभयपक्षी व्यापार आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवितानाच कोरियाने महाराष्ट्राकडून फळांची आयात करावी अशी सूचना राज्यपालांनी वाणिज्यदूतांना केली. महाराष्ट्र डाळिंब, केळी, द्राक्षे, संत्रे, आंबे तसेच स्ट्राबेरी उत्पादनात अग्रेसर असून फळनिर्यातीचा उभय देशांना लाभ होईल, असे राज्यपालांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget