(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन | मराठी १ नंबर बातम्या

२२ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

मुंबई ( १४ फेब्रुवारी २०१९ ) : खेळाडू हा मैदानात असेपर्यंत खेळात नैपुण्य दाखवतो पण त्यांनतरच्या काळात त्याला आवडत असलेल्या क्रीडाप्रकारात पुढील अभ्यासामुळे शिकण्याची संधी त्या खेळाडूला मिळत नाही. खेळाडूंना अभ्यासासोबत त्यांच्या आवडीच्या क्रीडाप्रकारात पुढे शिकून राज्याला आणि देशाला प्रगतशील आणि गतिमान क्रीडा संपन्न बनविण्यासाठी स्पोटर्स सायन्स सेंटर सुरू करण्याची गरज असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठात २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन विद्यानगरी परिसरातील क्रीडा संकुलात दिनांक १४ ते १८ फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदचे सदस्य दिपक कुमार मुकादम, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. अजय देशमुख, क्रीडा व शारीरिक शिक्षण समनव्यक उत्तम केंद्रे, उपस्थित होते.

तावडे यावेळी म्हणाले, या स्पोटर्स सायन्स सेंटरमध्ये क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा व्यवस्थापन यांसारखे विविध क्रीडा विषय विद्यार्थांना शिकविण्यात येतील. या सेंटरमुळे क्रीडा संस्कृतीला गती मिळेल असा विश्वास वाटतो.

आजच्या वेगवान तांत्रिकदृष्ट्या प्रगत काळात आपली तरुण पिढी ही सायबर गुलाम बनली आहे. असे असताना खेळाडू हा फक्त मैदानावर खेळून देशाची आणि राज्याची प्रगती घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळेच खेळाडू यांनी राज्याची आणि देशाची प्रगती घडवून आणण्यासाठी सायबर गुलामी विरोधातल्या चळवळीचे प्रणेते होणे आवश्यक आहे.

राजभवन महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाचा पहिला बहुमान मुंबई विद्यापीठाला १९९७ ला मिळाला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षानंतर मुंबई विद्यापीठाला या स्पर्धेच्या यजमान पदाचा बहुमान मिळाला असून ही अत्यंत अभिनंदनीय आणि अभिमानास्पद बाब आहे.या क्रीडा स्पर्धेत राज्यातील सर्व २० अकृषी आणि कृषी विद्यापीठे सहभागी होणार असून या क्रीडा महोत्सवात कबड्डी(पुरुष व महिला), खो-खो (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष व महिला), बास्केटबॉल (पुरुष व महिला), मार्ग व मैदानी स्पर्धा (पुरुष व महिला) या एकूण पाच खेळ प्रकारांचा समावेश असणार आहे. १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या विविध स्पर्धां विद्यानगरी संकुल कलिना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय वडाळा, भवन्स महाविद्यालय अंधेरी आणि विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स येथे सकाळी ७.३० वाजता पासून या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी तावडे यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget