(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर आता शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू | मराठी १ नंबर बातम्या

शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर आता शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू

मुंबई, दि. २२ -महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, १९७७ मधील व्याख्येनुसार असलेल्या अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आज प्रसिध्द झाला.

शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत असताना, शिक्षकांनाही त्याचवेळी हा वेतन आयोग लागू होत आहे. वेतन आयोगाच्या आतापर्यंतच्या इतिहासात यापूर्वी वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिक्षकांना कधी सहा महिन्यांनी तर कधी आठ महिन्यांनी वेतन आयोग लागू व्हायचा . पण यंदा पहिल्यांदाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रयत्नाने शिक्षकांनाही शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.

वेतन आयोग शिक्षकांना लागू होण्याचा इतिहास पाहता सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनतर शिक्षकांना याचा लाभ मिळाला होता तसेच पाचव्या वेतन आयोगाचा लाभ शिक्षकांना सुमारे चार महिन्यांनतर देण्यात आला होता. सातवा वेतन आयोग शासकीय कर्मचाऱ्यांच्याबरेाबर लागू होण्याची, अशी
ही पहिलीच वेळ आहे.

या निर्णयामुळे राज्यातील अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये आणि सैनिकी शाळांतील पूर्णवेळ शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget