मुंबई ( ६ फेब्रुवारी २०१९ ) : सहकार आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली दि. 10 जानेवारी 2019 रोजी झालेल्या शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाच्या सभेत सन 2018 मध्ये झालेल्या जी.डी.सी. ॲन्ड ए. व सी.एच.एम. परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे.
हा निकाल https://gdca.maharashtra.gov.in व https:sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पहाण्यासाठी उपलब्ध आहे.
या निकालाच्या फेरगुण मोजणीसाठी दि. 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर मोजणीसाठी परिक्षार्थ्यांना आपले लॉगइन व पासवर्डचा वापर करुन अर्ज करता येईल. फेरगुण मोजणी करण्यासाठी फेरगुणमोजणी शुल्क भारतीय स्टेट बँक (SBI) या बँकेच्या कोणत्याही जवळच्या शाखेत प्रत्येक विषयासाठी 75 रु. अधिक बँक चार्जेस याप्रमाणे चलनाद्वारे भरावे. बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मुदत दि. 15 फेब्रुवारी पर्यंत राहील. हे चलन बँकेत दि. 18 फेब्रुवारी (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत) पर्यंत भरणा करावे. विहीत तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही, असे जीडीसी ॲन्ड ए बोर्डाचे सचिव तथा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा