(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अंतर्गत सुरक्षेकरीता अधिकचे पोलीस बळ उपलब्धतेसाठी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित | मराठी १ नंबर बातम्या

अंतर्गत सुरक्षेकरीता अधिकचे पोलीस बळ उपलब्धतेसाठी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित

मुंबई, दि. 28 : देशाच्या सीमेवर असणारी स्थिती लक्षात घेवून अंतर्गत सुरक्षा अबाधीत राखण्यासाठी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुरक्षेकरिता तैनात असलेले सहा हजार पोलीस मुंबईसह राज्यातील अन्य भागात उपलब्ध करुन देण्‍याकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात घाबरुन जाण्याची स्थिती नसून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले.

दोन्ही सभागृहांचे आभार मानत मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन संस्थगित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, जम्मू काश्मिर मधील पुलवामा येथे भारतीय जवानांवर निर्घृण हल्ला झाला. त्यानंतर भारतीय वायू सेनेने सर्जिकल स्ट्राइक करुन दहशतवादी संघटनांचे अड्डे नष्ट केले. काल देखील सीमेवर घटना घडल्या. ही तणावाची स्थिती लक्षात घेता त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदल सक्षम आहे. अंतर्गत सुरक्षा देखील अबाधित राखणे महत्वाचे आहे. आर्थिक राजधानी असलेले
मुंबई शहरासोबतच अन्य शहरांमध्ये नेहमीपेक्षा जास्त निगराणी असावी. ही पोलीस विभागाची भावना आहे. घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र काळजी घेणे गरजेचे आहे.

राज्यात सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी सहा हजार पोलीस तैनात आहेत. या भागात काही महत्वपूर्ण इमारतीदेखील आहेत. राज्यात सुरक्षेसाठी अधिकचा पोलीस फोर्स मिळाला तर अधिकची काळजी घेता येईल. यासंदर्भात काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात पोलीस महासंचालक,
मुंबई पोलीस आयुक्त यांनी राज्यातील परिस्थ‍ितीची माहिती दिली. आम्ही योग्य तो विचार केला. आज सकाळी बैठक घेतली आणि त्यात एकमताने अधिवेशन संस्थगित करण्याबाबत निर्णय घेतला. अधिवेशन आटोपून जो पोलीस फोर्स उपलब्ध होणार आहे. तो मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात उपलब्ध करुन देण्यात येईल.
विरोधी पक्षांनी देखील याला सहमती दिली.

अधिवेशनाचे सर्व कामकाज पुर्ण झाले. भाषणेदेखील पटलावर ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यात घाबरुन जाण्याची परिस्थिती नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तत्काळ पाकिस्तानने सोडावे. संयुक्त राष्ट्र संघाचे जे नियम आहेत. त्याचे पालन व्हावे, असा ठराव मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडला. त्याला सभागृहाने एकमताने पाठिंबा दिला.

दरम्यान अधिवेशन संस्थगित करण्याच्या निर्णयाला एकमताने पाठिंबा देत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, जयंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, अधिवेशन आज संस्थगित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतही मांडला. मुख्यमंत्री महोदयांच्या या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री शरद रणपिसे,
कपिल पाटील यांनी एकमताने पाठिंबा दर्शवित आपले मनोगत व्यक्त केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget